Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

 

 

 
Maharashtra Navnirman Sena
वैशाली दरेकर
लोकसभा मतदारसंघ - कल्याण
 
कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर, अतिशय तरुण वयात आपले ‘राजकीय स्थान’ निर्माण करणारे तडफदार महिला नेतृत्व. तसेच जन्मभूमी व कर्मभूमी कल्याण लोकसभा मतदारसंघच असलेल्या एकमेव स्थानिक उमेदवार.

राजकीय कारकीर्द :

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा म्हणून जोमाने कार्यरत.
  २००० मध्ये कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जिंकून सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवड.
  महानगरपालिकेत कार्यरत असताना अनेक मूलभूत विषयांचा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने पाठपुरावा केला. त्यामध्ये पाणी, रस्ते आणि नगरविकास या विषयांचा समावेश.
  २००५ पासून मा. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत.
  मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग आणि त्यावेळीची परिस्थिती हाताळताना सिद्ध केलेले नेतृत्व गुण.
  स्मशानभूमितील सुविधांसाठी तिरडी आंदोलन, रस्त्यावरील खड्यांसाठीचे आंदोलन, परप्रांतिय विरोधी आंदोलन, नाट्यगृहाच्या नामकरणासाठीचे आंदोलन अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून ते मराठी अस्मितेच्या प्रश्नांपर्यंत सर्व पातळीवरच्या आंदोलनांमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग.

सामाजिक कार्य :

नगरसेविका म्हणून कार्यरत असताना गरजू महिला व विद्यार्थ्यांना स्वावलंबी व प्रशिक्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचा अवलंब.
विद्यार्थ्यांना एम.एस.सी.आय.टी. या शासनमान्य संगणक कोर्सचे मोफत प्रशिक्षण.
  बगरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करून स्वयंरोजगारासाठी प्रेरित केले.
  महिलांसाठी विविध रोजगार प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन.
  बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे कार्य सुरू.

वैयक्तिक माहिती :

वाणिज्य शाखेतील पदवीधर (पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली)
महाविद्यालयात शिकत असताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.एस.एस.) बेस्ट कॅडेट म्हणून सुवर्णपदक प्राप्त.
कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे.
  वयाने आणि अनुभवाने लहान असूनही कोणतीही राजकीय पार्श्र्वभूमी नसताना आत्मविश्वासाने आणि जिद्दीने, वयाच्या अवघ्या तिशीमध्ये पक्षाची जबाबदारी सांभाळणारे खंबीर महिला नेतृत्व.
 

संपर्क :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक कार्यालय
पाटणकर चौक, चार रस्ता, रंगोली हॉटेलजवळ,
डोंबिवली.