Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

  मनविसे चा १० का दम

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला वाचा फोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी संबंधित विद्यार्थ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आवाज दडपुन टाकण्याचे तसेच त्यांना वार्षिक परीक्षेस बसू न देण्याचे कारस्थान मुंबई विद्यापीठ करीत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेवर एक वर्षाची बंदी घालण्यात येणार आहे असे काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले पण तसे लेखी पत्र विद्यापीठाने दिले नाही. तरीही विद्यापीठाचे अधिकारी मनविसे च्या कार्यकर्त्याना भेटण्याचे टाळत आहेत मनविसे वर विद्यापीठाने जणु काही अघोषित बंदीच घातली आहे. अधिकार्‍यांना भेटायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकाराची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधे उमटू लागली आहे.

मनविसे ने विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आणल्यानंतर सूड्बुद्धीने विद्यापीठ असे वागत आहे. स्टिंग ओपरेशन ने परीक्षा विभागातील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर अधिकार्यांवर कारवाई करण्याऐवेजी विद्यापीठ विद्यार्थी प्रिय संघटनेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.मनविसे अध्यक्ष श्री.आदित्य राजन शिरोडकर यांनी या संदर्भात कुलगुरूंना एक पत्र लिहिले आहे व त्यात विद्यापीठाला १० प्रश्न विचारले आहेत.(पत्र पहा).

विद्यार्थ्यांच्या मागण्या व त्यांच्या अडचणी समजून घेणे हे विद्यापीठ व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे. परंतु विद्यापीठाला त्याची जाणीवही नाही. मात्र जाणीव करून देणार्‍या विद्यार्थी संघटनेला गुन्हेगार ठरवून त्यांच्या विरुद्ध सूड्बुद्धीने व आकसाने कारवाई करणे ही निव्वळ राक्षसी वृत्तीच नाही काय?.