Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

 
 
Maharashtra Navnirman Sena
श्री. शिशिर कृष्णराव शिंदे
लोकसभा मतदारसंघ - उत्तर पूर्व मुंबई
 
सरचिटणीस म्हणून संघटन, उपक्रम - आंदोलने - कार्यक्रमांचे संयोजन याद्वारे पक्षकार्य, लोकप्रतिनिधित्वाचा समृद्ध अनुभव, तसेच प्रवक्ता म्हणून पक्ष व सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणूनही उत्तम कामगिरी.

राजकीय कारकीर्द :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून जबाबदारी.
  एक राजकीय कार्यकर्ते म्हणून प्रामख्याने मुंबईत गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व आंदोलनांत - उपक्रमांत आघाडीवर राहून सक्रिय सहभाग.
  प्रवक्ता या नात्याने मनसेची भूमिका व विचार आक्रमकतेने व प्रभावीपणे मांडत आहेत.
  १९९६-२००२ या कालावधीत विधान परिषद आमदार.
  आपल्या आमदारकीच्या काळात जनतेचे प्रतिनिधित्व अभ्यासपूर्ण रीतीने व हिरीरीने करत असतान उत्कृष्ट संसदपटू हा सर्वोच्च बहुमान प्राप्त.
१९९२ - १९९७ या काळात मुलुंडमधून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राजकारणात नवा आहे. मा. राज ठाकरे यांच्यासह प्रत्यक्ष राजकारणाचा, लोकप्रतिनिधित्वाचा अनुभव असलेले मोजके राजकीय नेते पक्षात आहेत, त्यातीलच एक कुशल नेतृत्व म्हणजे शिशिर शिंदे होत.
     

सामाजिक कार्य :

मुलुंड येथील ‘आपली आई’ व ‘हिंदवी सहकार संस्था’ या सामाजिक संस्थांचे संस्थापक.
मुलुंड येथे छत्रपती संभाजीराजे उद्यानात संगीताच्या तालावरील मुंबईतील पहिला जॉगिंग ट्रॅक (म्युझिकल ट्रॅक) सुरू केला.
  नागरिकांना आरोग्यविषयक सहकार्य, गरजू व गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी भरणे, मोफत वह्या - पुस्तकांचे वाटप आणि वाचनालयासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सतत सहभाग.
  विनामूल्य ऑर्थोपॅडीक उपकरणांच्या पेढीची स्थापना करून अनेक फॅयाक्चर रुग्णांसाठी बहुमोल मदत करीत आहेत.
  कारगील युद्ध सुरू असताना युद्धभूमीवर जवानांसोबत राहण्याचे व मदतनिधी जमा करण्याचे मोठे काम.
  लातूर व गुजरातमधील भूकंप यासार‘या नैसर्गिक आपत्तींमध्ये प्राथमिकतेने व धडाडीने साहाय्य.
  मुंबईतील रेल्वे आंदोलन तसेच बेस्टच्या दरवाढी विरोधातील आंदोलन अशा आंदोलनात स्वत: रस्त्यावर येऊन आंदोलनांमध्ये यशस्वी सहभाग.

वैयक्तिक व कौटुंबिक माहिती :

सामाजिक कार्य व राजकारण ही विशेष आवडीची क्षेत्रे. तसेच व्यायामाची पण विशेष आवड.
इंजिनिअरिंग वर्कशॉप हा व्यवसाय.
पक्ष - प्रवक्ता हा पक्षाची भूमिका, तत्त्वे, धोरणे व कार्यपद्धती जनतेसमोर व प्रसारमाध्यमांसमोर मांडणारा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. ही महत्त्वाची जबाबदारी आपल्या अभ्यास व वक्तृत्वासह यशस्वीतेने पार पाडणारे व्यक्तिमत्त्व.
 

संपर्क :

विजयवाडी को. ऑप. हौ. सोसायटी, शॉप नं. ५,
नवघर पो. स्टे. बीट समोर,
हनुमान चौक, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०००८१
फोन : ९५२२ - २१६३ ९२९२