Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

 
   
Maharashtra Navnirman Sena
सौ. शालीनीताई जितेंद्र ठाकरे
लोकसभा मतदारसंघ : उत्तर - पश्र्चिम मुंबई
 
‘छोट्या-मोठ्या पायाभूत सुविधांसाठी सामान्य नागरिकांना झगडावे लागू नये’ - अशा आदर्श स्थितीचे ध्येय समोर ठेवून प्रत्यक्ष राजकारणात सकि‘य!

राजकीय कारकीर्द :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत.
  उपाध्यक्षा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना;
सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना,
सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अशा विविध पदांची जबाबदारी.
  ठाणे जिल्ह्यातही महिलांचे उत्तम संघटन साधले आहे.
  उच्चतम शिक्षण, अंगभूत कौशल्ये, महिलांचे संघटन, राजकीय - सामाजिक समस्यांचा व प्रक्रीयांचा अभ्यास... आदी बाबींसह राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
  ‘एक उत्तम खासदार’ म्हणून संसदेत व मतदारसंघात नेमके काय करायचे असते, याबाबत अधिक स्पष्टता असलेल्या नेत्या म्हणजे शालीनीताई ठाकरे होत.
  दुय्यम दर्जाच्या, खाण्यायोग्य नसलेल्या गव्हाबाबत आंदोलन केले. हा भ्रष्टाचार उघडकीला आणून त्या गव्हावर बंदी आणली.
पक्षाच्या विविध राज्यस्तरीय व स्थानिक आंदोलनांत सक्रीय सहभाग.

सामाजिक कार्य :

पक्षाच्या माध्यमातून प्रामु‘याने महिला विकासासाठी कार्यरत आहेत. विशेषत: झोपडपट्टीतील महिलांच्या विकासासाठी अधिकाधिक कार्य करण्याची इच्छा.
सौ. शालीनीताईंच्या पुढाकाराने सुमारे ३० औद्योगिक संस्था महिलांसाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून स्वस्त धान्य दुकाने, काही लघुउद्योग महिलांना सुरू करण्यास सहकार्य केले जाते. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी त्यांना काही ‘कॉन्ट्रॅक्ट्स’ ही दिली जातात.
  मोठी इस्पितळे, कॉल सेंटर्स, माहिती - तंत्रज्ञान उद्योग यांमध्ये शेकडो मराठी तरुणांना नोकर्‍या मिळवून देण्यात सहकार्य.
  ‘महिलांचे बचत गट व त्या माध्यमातून महिलांचा विकास’, या सूत्राचा विचार करून कार्यरत आहेत.
  ‘महिलांच्या आरोग्यविषयक कार्यशाळा, आरोग्य शिबिरे असे विधायक उपक्रम योजण्यातही पुढाकार.

व्यावसायिक अनुभव .....

सौ. शालीनीताई या व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चशिक्षित तज्ज्ञ आहेत.
महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग कार्पोरेशन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत आहेत.
  मिनरल वॉटर, उपाहारगृहे आदी उद्योगांत गेली १५ वर्षे यशस्वीपणे विविध जबाबदारी सांभाळत आहेत.
 

शिक्षण :

उच्च शिक्षणासह अतिशय उत्तम दर्जाची शैक्षणिक कारकीर्द.
शालेय शिक्षण ठाणे येथे पूर्ण.
माटुंगा येथील पोदार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त.
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथील जगप्रसिद्ध विद्यापीठातून एम.बी.ए. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त.
 

वैयक्तिक व कौटुंबिक माहिती :

मूळ पंजाबी व्यक्तिमत्त्वाला ‘ठाकरे’ घराण्याचे वलय लाभले आहे.
वयाच्या ३ र्‍या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये (ठाणे येथे) राहत आहेत; म्हणूनच येथील संस्कृतीशी समरस झालेल्या आहेत. त्या स्वत:ला ‘महाराष्ट्रीयच’ मानतात आणि ‘महाराष्ट्रीय’ असल्याचा त्यांना अभिमान आहे.
सौ. शालीनीताईंचे आजोबा (आईचे वडील) कै. भगतराम तलवार हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. विशेष म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचे ते निकटचे सहकारी होते. भगतराम तलवार यांचे बंधू (शालीनीताईंचे चुलत आजोबा) हरिकिशन तलवार यांनीदेखील स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी लढण्याची प्रवृत्ती असलेल्या अशा कुटुंबाची पार्श्र्वभूमी सौ. शालीनीताईंना लाभली आहे.