Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

 
   
Maharashtra Navnirman Sena
श्री. रणजित श्रीकांत शिरोळे
लोकसभा मतदारसंघ - पुणे
 
तरुण प्रमुख नेतृत्व आणि तरुणांचा प्रचंड पाठिंबा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बलस्थाने आहेत. याच बलस्थानांचे प्रतिबिंब म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण रणजित शिरोळे. सामाजिक व राजकीय समस्या मूळापासून जाणून घेण्याची तयारी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठीची प्रामाणिक धडाडी ही रणजित यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये.

राजकीय कारकीर्द :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर सरचिटणीस अशी जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
  मा. राज ठाकरे यांचे चुंबकीय नेतृत्व व मा. दीपक पायगुडे यांचे मार्गदर्शन यांसह राजकीय वाटचाल सुरू आहे. पक्षाच्या स्थापनेपूर्वीपासूनच मा. राज ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व आंदोलनांत पुणे शहर स्तरावर सक्रिय सहभाग.
  प्रामुख्याने पुणे शहराच्या ‘राजकीय समस्यांची’ परिपूर्ण जाणीव रणजित शिरोळे यांना आहे.
पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या कल्पक आंदोलनात पुढाकारासह सहभाग. पुणे महानगरपालिकेच्या इमारतीसमोरच्या रस्त्यावरच खड्डयांमध्ये फलक लावून आंदोलन केले होते.

सामाजिक कार्य :

पर्यावरण, क्रीडा व नाट्य क्षेत्र यांमध्ये विशेषत्वाने कार्यरत आहेत.
स्वरराज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. या प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान, रक्तदान, क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक‘मांचे आयोजन केले जाते.
  मा. दीपक पायगुडे यांनी स्थापन केलेल्या लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होतात.
  शिवकालीन किल्ल्यांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन पक्षाच्या माध्यमातून पुण्यात योजण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे एखाद्या व्यक्तीशी संबंधित सर्वाधिक छायाचित्रांचे प्रदर्शन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गिनिज बुकमध्ये नोंदले गेले. या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनात रणजित यांचा मोठा सहभाग होता.

तरुण, सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व ....

रणजित कसलेले क्रीडापटू आहेत. ‘कराटे’ हा त्यांचा आवडता खेळ. फ्लोरिडा येथे १९९६ मध्ये झालेल्या जागतिक कराटे स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त. रणजित यांनी कराटेमधील ‘ब्लॅक बेल्ट’ ही मिळवलेला आहे.
नाट्यक्षेत्राचीही आवड असून नाट्यसंस्थेच्या माध्यमातून काही काळ कार्य केले.
  राजकीय कार्यकर्ता व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला नेमके काय करायचे आहे याचा रणजित यांचा ‘होमवर्क’ तयार आहे. या अभ्यासातून त्यांनी पुणे ‘शहराच्या नवनिर्माणाची’ नऊ सूत्रे (सुनियोजित नगर विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला विकास, मराठी भाषा विकास .... इत्यादी सूत्रे) पुणेकरांसमोर ठेवली आहेत.
  नावाप्रमाणेच कोणत्याही ‘रणात’ जिंकण्याची क्षमता.
 

शिक्षण :

शालेय शिक्षण पुणे येथे झाले.
फार्मसी अभ्यासक्रमातील पदविका प्राप्त (डी. फार्म सी.)
फर्गसन महाविद्यालयातून कला अभ्यासक्रमातील पदवी प्राप्त (बी. ए)
 

कौटुंबिक वारसा..... :

‘शिरोळे’ कुटुंब हे सामाजिक , राजकीय क्षेत्रातील, सर्वसामान्यांना सुपरिचित असलेले कुटुंब आहे.
आजोबा (कै. भाऊसाहेब शिरोळे) पुण्याचे महापौर होते, त्यांनी विधानपरिषद आमदारपदही भूषविले. आजी (शकुंतला शिरोळे) देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कार्यरत होत्या. रणजित यांच्या वडिलांचीही (अॅड. श्रीकांत शिरोळे) पुणे महानगरपालिकेतील कारकीर्द लक्षणीय होती.

संपर्क :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक कार्यालय
१६०, शिवाजीनगर गावठाण, तालीम चौक,
पुणे - ४११००५
भ‘मणध्वनी - ९८९००४८५२८, ९८२२००७०५१