Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

 
   
Maharashtra Navnirman Sena
श्री.राजन राजे
लोकसभा मतदारसंघ-ठाणे
 
‘सर्वसामान्यांचं जीवन-मरण आणि पर्यावरण....हवं फक्त एवढ्याचसाठी राजकारण..’
ही भूमिका घेऊन समाजकारणातून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करणारे स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व.

राजकीय कारकीर्द :

थेट राजकारणाचा व लोकप्रतिनिधित्वाचा अनुभव कमी असला, तरी पर्यावरणाच्या भीषण प्रश्नाची अभ्यासासह जाणीव , सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुविधायुक्त करण्यासाठी राजकारण ही भूमिका आणि स्वच्छ प्रतिमा या घटकांसह पक्षाद्वारे कार्यरत आहेत.
आपली बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती, संवेदनशील मनासह प्रतिभा या गुणांना खेळ-योग-अध्यात्माची जोड आणि कामगार व उद्योग क्षेत्रातील अनुभव यांसह राजकारणात यशस्वी होण्याची क्षमता.

सामाजिक कार्य :

कामगार विकासासाठीचे कार्य हे राजे यांच्या सामाजिक कार्याचे प्रमुख अंग आहे.एका कंपनीतील कामगार संघटनेचे गेली २७ वर्षे अध्यक्ष आहेत. या दीर्घ काळात या कंपनीत एकही संप-मोर्चा झालेला नाही. कामगार व व्यवस्थापन यांमध्ये अद्वितीय समन्वय साधण्यात यश.
कर्मचारी-अधिकार्‍यांना सुयोग्य वेतन, कंत्राटी पद्धतीचे उच्चाटन अशा अनेक बाबतीत यश.
  अन्य काही कंपन्यांतील समस्यांबाबत उपोषण, संप, मानवी साखळीसारखी आंदोलने यांमध्ये सहभाग.
  सेवा क्षेत्रातील एक प्रकारची अस्पृश्यता व गुलामगिरीविरुद्ध प्रखर झगडा सुरू.
  गेल्या एक तपाहून अधिक काळ ठाणे शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य.
  पर्यावरण संगोपन व संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीचे प्रयोग स्वत: करत आहेत.
  श्री माउली सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरात सहकार क्षेत्रात कार्यरत.
  योग प्रशिक्षकाच्या भूमिकेतून सुमारे ३००० लोकांना योग प्रशिक्षण.

वैयक्तिक माहिती :

कामगार संघटना क्षेत्राशी संबंध असूनही नावावर एकही गुन्हा नसलेली स्वच्छ प्रतिमा हे व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख वैशिष्ट्य.
शालेय व महाविद्यालयीन जीवनात परीक्षांत विशेष सुयश प्राप्त.
उत्तम लेखक व वक्ते आहेत. नैसर्गिक शेती, कामगार क्षेत्र, शिक्षण, खेळ, योग शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर सातत्याने लेखन व व्याख्याने ‘राजहंस’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. रसिकांनी त्याचे चांगले स्वागत केले आहे.
‘दोनपेक्षा अधिक जन्माला येणारं मूल
देशातील समस्यांचं ...खरं मूळ’
‘नैसर्गिक शेती....अस्तित्वाची शाश्वती’ या शब्दांतून त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटते.
माहिती तंत्रज्ञान युगाशी व तरुणाईशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व. यांची www.rajanraje.com ही वेबसाईटही (संकेतस्थळ) आहे.
 

शिक्षण :

कला अभ्यासक‘माची पदवी (बी. ए.) व विधी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त.(एल.एल.बी.)

संपर्क :

६०१/६०२, शुभारंभ १, इमारत क‘.७,
कोकणी पाडा मार्ग, घोडबंदर रोड,
ठाणे-४०० ६१०
दूरध्वनी : ०२२-२५८९ ८६००
भ्रमणध्वनी: ९८२१० ६४८९८