Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

  ठळक घडामोडी

सौ. शर्मिला राज ठाकरे प्रचाराच्या रणधुमाळीत! ! !
श्री. राजसाहेब ठाकरे यांनी कल्याण मतदारसंघात १ व मुंबईत ३ अशा ४ महिला उमेदवार दिल्या आहेत.
महिला सबलीकरणाच्या गमजा मारणार्‍या इतर पक्षांनी महिलांना उमेदवारीपासून लांबच ठेवले आहे. एखादा अपवाद वगळता महिलांबद्दल सर्व पक्षांच्या निराशाजनक भूमिकाच राहिल्या आहेत.

अशा या निराशाजनक परिस्थितीत राज साहेबांनी १२ पैकी ४ महिला उमेदवार दिल्या आहेत त्यामुळे 
महिला वर्गात प्रचंड समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सौ. शर्मिला राज ठाकरे या सुद्धा मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. जनसंपर्क व प्रचार फेर्‍या यांचा धडाकाच त्यांनी सुरू केला आहे. मनसेचे कार्यकर्ते सौ. शर्मिला ठाकरे यांना आदराने 'वहिनी' असे संबोधतात. रणरणत्या उन्हात शर्मिला वहिनी मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. वहिनी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याने मनसे कार्यकर्त्यात सुद्धा चैतन्य निर्माण झाले आहे.

वहिनींच्या प्रचाराची क्षणचित्रे 
( ३ एप्रिल'०९--- उत्तर मुंबई)( 4 एप्रिल'०९--- मध्य मुंबई )( ५ एप्रिल - उत्तर पूर्व मुंबई) ( एप्रिल'०९)

मनविसे चा १० का दम
मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला वाचा फोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी संबंधित विद्यार्थ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आवाज दडपुन टाकण्याचे तसेच त्यांना वार्षिक परीक्षेस बसू न देण्याचे कारस्थान मुंबई विद्यापीठ करीत आहे.
(सविस्तर वृत्त)

मनविसे आणि "वॅलेंटाईन डे"
१४ फेब्रुवारी जशी जवळ येऊ लागते तेव्हा सगळ्यांना वेध लागतात ते "वॅलेंटाईन डे" चे.
पत्रकरांपासून कॉलेज च्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच आम्हाला "तुमची भूमिका काय?" असे प्रश्न विचारू लागतात.

वॅलेंटाईन डे साजरा करावा की नाही हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मनविसे वॅलेंटाईन डे ला विरोध ही करणार नाही व त्यास प्रोत्साहन ही देणार नाही.

अशा गोष्टींमागे वेळ आणि शक्ति व्यर्थ करण्यापेक्षा मनविसे विद्यार्थी हीताची कामे अखंडपणे सुरू ठेवेल...

मुंबई विद्यापीठाचा अंदाधुंद कारभार.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाचे पीतळ उघडे पाडले आहे.
मनविसेने या अंदाधुंद कारभाराची चित्रफितच काढली आहे. ज्यात विद्यापीठ खुलेआम विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे 
(सविस्तर वृत्त) ( व्हिडिओ पहा ).

मनविसेचा विजय .
दिनांक २७ जानेवारी रोजी मनविसे ने केलेल्या आंदोलनाने मुंबई विद्यापीठ खडबडून जागे झाले व मराठी भाषेची गळचेपी करणारा निर्णय स्थगित केला.
(सविस्तर वृत्त).