Raj Saheb
|
|
Home Page
मुख्य पान | मनविसे विषयी
| घडामोडी
| विद्यार्थ्यांसाठी
| संग्रह |
सामिल व्हा |
संपर्क
|
 |
| |
करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे .
मुला - फुलांचे कवी साने गुरुजी यांच्या उक्तिला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या भायखळा विभागाने बालकांसाठी एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे.
जिजामाता प्राणीसंग्रहालय भायखळ्यात आहे. परंतु भायखळ्यातील शालेय विद्यार्थी मात्र या प्राणीसंग्रहालयाचा लाभ घेण्यापासून वंचित राहीले आहेत. याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेला वाटत आहे. म्हणूनच भायखळ्यातील छोट्या छोट्या सहली काढून त्यांना प्राणीसंग्रहालयाचे तेथील नैसर्गिक वातावरणाचे आणि वस्तुसंग्रहालयाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
मा.आ.श्री.बाळा नांदगावकर व मनविसेचे अध्यक्ष आदित्य राजन शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मनोरंजनाद्वारे सामन्यज्ञान देण्याचा हा प्रयत्न आहे.
कामगार भागातील गिरण्यांची धुरांडी थंड पडोत किंवा जागतिक मंदीची लाट येवो, त्याचे चटके बालमनालाच प्रथम जाणवतात. फुंकर घालून ती मने फुलविली पाहिजेत. त्यांच्या हळुवार भावना जपल्या पाहिजेत. या प्रचंड महानगरीत ही फुले गुदमरून गेली आहेत. खेळावे, हसावे, बागडावे आणि क्षणभर स्वत:ला विसरून मनमुराद आनंद लुटावा यासाठीच हा सारा खटाटोप !
" तूच तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का "
अशा शब्दात जगन्नियंत्या परमेश्वराचा शोध घेणार्या कवीचे आम्हाला स्मरण होते. त्या चिमुरड्यांचे निरागस हास्य आम्हाला हवे आहे.
कार्यक्रमाची वेळ ८ मार्च '०९ सकाळी ८
वाजता
अधिक माहितीसाठी श्री. अमोल रोग्ये
(विभाग अध्यक्ष-मनविसे,भायखळा) यांच्याशी
९८६७७१२३८९
या क्रमांकावर संपर्क साधावा.
मनविसे जळगाव आयोजित "आदित्य चषक २००९"
(छायाचित्र संग्रह)
मनविसेचे अध्यक्ष श्री.आदित्य राजन शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त, मनविसे - जळगावने ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन स्व:त श्री. आदित्य राजन शिरोडकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी मनविसेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख सचिन शिंदे, सहसंपर्क प्रमुख प्रथमेश कुलकर्णी हे उपस्थित होते.
एकूण २० एकांकिकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत औरंगाबाद, अमरावती, वर्धा आणि नाशिक येथील नामवंत संस्थांनी भाग घेतला आहे. प्रथम विजेत्यास रु १०००१ रोख पारितोषिक व "आदित्य चषक" आणि द्वितीय व तृतीय येणार्या एकांकिकेस अनुक्रमे रु. ७००१ व ५००१ रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेला परीक्षक म्हणून गजानन संगेकर, सतीश देशमुख व मंजुषा भिडे हे अनुभवी रंगकर्मी लाभले आहेत.
जिल्हा अध्यक्ष विनोद शिंदे, शहर अध्यक्ष राहुल मोपारी, शहर संघटक अजित शिंदे, उपशहर अध्यक्ष धनंजय खर्चे आणि इतर मनविसे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली.
`बॉलडान्स' चे अपूर्व यश
(छायाचित्र संग्रह)
`महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तरूणांच्या हिताचे पहिले पाऊल टाकले ते `बॉल डान्स'च्या रूपात . खरे तर `बॉल डान्स' ही कल्पनाच जगावेगळी होती. क्रिकेटमधील `बॉल' म्हणजे `चेंडू' आणि `डान्स' म्हणजे `नृत्य' असे दोन शब्द एकत्र करून क्रिकेट आणि नृत्य अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धा विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरल्या.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार महानगरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यात हिरीरीने भाग घेतला. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी या विद्यार्थ्यांची जणु अहमहमिकाच लागली. चुरस निर्माण झाली.
तरूणांमधील कला आणि क्रीडा गुणांना संधी
देणार्या या पहिल्याच प्रयोगाने विद्यार्थ्यांची मने काबीज केली. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रमाची उंची वाढली. अंधेरीच्या क्रीडा संकुलात त्याच्या अंतिम स्पर्धा झाल्या, तेव्हा 35 हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने क्रीडा संकुल दणाणून गेले. विद्यार्थ्यांच्या जल्लोने पार पडलेला तो क्षण अविस्मरणीय होता.
|
| |
`फोकस करियर फेअर' तरूणांचा दिपस्तंभ
(छायाचित्र संग्रह)
`बॉल डान्स'च्या पाठोपाठ `मनविसे'ने तरूणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी `फोकस करियर फेअर'चे आयोजन केले.
२००६ आणि २००८ अशा सतत दोन वर्षे `फोकस करियर फेअर' द्वारे `मनविसे'ने तरूणांना भविष्याचा मार्ग मोकळा करून दिला. प्रभादेवीच्या रविंद्र नाटय मंदिरात
१२ ते १४ एप्रिल
२००८ या कालावधीत पार पडलेला हा उपक्रम म्हणजे कर्तबगार तरूणांना विविध क्षेत्रे काबीज करण्याचे आव्हानच ठरले !
पदवी मिळवून नोकरी धरणे एवढेच ध्येय आता तरूण पिढीसमोर नाही. कर्तबगारीची नवनवीन क्षेत्रे रूंदावत आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गाने जावे? कोणत्या अडचणी त्यांना भेडसावत आहेत? या सर्वांचा अभ्यास करून `मनविसे'ने आदित्य
राजन शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला `फोकस करियर फेअर' विद्यार्थ्यांना दिलासा देऊन गेला. अडचणींवर मात करीत विकासाचा मार्ग
धरणार्या हजारो विद्यार्थ्यांना जणु `दीपस्तंभ'च गवसला !
जाहिरात, दळणवळण, सौंदर्य साधना, इव्हेंट मॅनेजमेंट, चित्रपट निर्मिती, आदरातिथ्य, माहिती व तंत्रज्ञान, प्रसिद्धी माध्यमांचे व्यवस्थापन, संशोधन आणि विकास, ध्वनीमुद्रण, छायाचित्रण, पत्रकारिता, हवाई सुंदरीचे प्रशिक्षण इत्यादींचे शिक्षण
देणार्या नानाविध क्षेत्रातील नामवंत संस्था त्यात सहभागी झाल्या होत्या. तज्ञ मान्यवरांचे त्यांना
मार्गदर्शन
लाभले.
|
| |
¬ शिवतीर्थावर अवतरला `महाराष्ट्र धर्म'
(छायाचित्र संग्रह)
तरूण आणि विद्यार्थीप्रिय उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे `मनविसे'चा आत्मविवास वाढला. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा आणि इतिहास यांच्या जतनाची आणि संवर्धनाची हाक राजसाहेबांनी विद्यार्थ्यीवर्गाला दिली. त्यातूनच शिवतीर्थावर उभा राहिला भव्य - दिव्य `महाराष्ट्र धर्म' !
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पासून इतिहासकार बाबासाहेब पुंरदरे यांच्यापर्यंत सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या काव्य वाचनाने `महाराष्ट्र धर्म'चा समारंभ पार पडला. इतिहासप्रेमी आणि साहित्य रसिक यांनी चक्क डोळयात पाणी आणून `महाराष्ट्र धर्म' वर प्रेमाचा वर्षाव केला, आणि हाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा असा आग्रहपूर्वक अभिप्रायही सादर केला.
सह्याद्रीच्या कडेकपारीत साडेतीनशे वर्षापूर्वी खणखणाट करीत मोगलांना `दे माय धरणी ठाय' करणारी शस्त्र, म्हणजे तेजाचा स्फुल्लींगच ! त्यांचे अपूर्व
दर्शन , देखणे दुर्गदर्शन
आणि
११० प्रकाशकांच्या मनोहारी पुस्तकांचे स्टॉल्स रसिकांना थक्क करीत होते. शिवतीर्थ रसिकांनी अक्षरश: भरून गेले. नातवापासून आजोबापर्यंत आणि सुनेपासून सासूपर्यंत लाखो रसिकांनी तेथे हजेरी लावली.
विशेष म्हणजे जागतिक विक्रम करून
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झालेल्या शिवरायांच्या गड-कोटांचे दुर्मिळ
दर्शन तेथे घडले.
|
|
|