Raj Saheb
अध्यक्षीय मनोगत
मध्यवर्ती कार्यकारिणी
कार्यक्रम
ध्येय
लोकसभा निवडणूक २००९ 
 
 

 

Home Page

मुख्य पान | मनविसे विषयी | घडामोडी | विद्यार्थ्यांसाठी  | संग्रह | सामिल व्हा | संपर्क

 
 
Maharashtra Navnirman Sena
श्री. बाळा नांदगांवकर
लोकसभा मतदारसंघ - दक्षिण मुंबई
 
महाराष्ट्रात ‘दिग्गजांचा पराभव करणारे’ राजकीय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले आणि मा. राज ठाकरे यांचेबरोबर एकनिष्ठतेसह ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवण्यासाठी प्रचंड कार्यक्षमतेसह, वेगाने कार्यरत असलेले नेतृत्व!

राजकीय कारकीर्द :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत.
१९९५ पासून सलग तीन वेळा माझगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.
विधानसभेतील दर्जेदार कामगिरीमुळे ‘उत्कृष्ट विधिमंडळपटू’ (संसदपटू) म्हणून पुरस्कार प्राप्त.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री म्हणून सुमारे ४ महिने जबाबदारी सांभाळली. या छोट्या कालावधीतही पोलीस दलाची स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले
मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. काही काळ शिक्षण समिती (म.न.पा.) सदस्य म्हणूनही काम पाहिले.
नगरसेवक असतानाच्या काळात मुंबई येथील विमानतळास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासाठी - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विमानतळावर नेऊन - प्रखर आंदोलन केले.
सुमारे १८ वर्षांचा लोकप्रतिनिधित्वाचा दमदार अनुभव.
गेली २५ वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य कार्यकर्ता ते गृहराज्यमंत्री अशा विविध भूमिकांतून सातत्याने कार्यरत आहेत.

सामाजिक कार्य :

एक संवेदनशील लोकप्रतिनिधी या नात्याने माझगावमध्ये घराघरात परिचित असलेले व्यक्तिमत्त्व.
नागरिकांना वैयक्तिक कामांसाठी मदत करण्यापासून ते विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक‘मांच्या आयोजनात सहभाग
  आपल्या कार्यक्षेत्रात दिवाळीच्या कालावधीत महाबचत मेळाव्याचे यशस्वीरीत्या आयोजन. या मेळाव्याद्वारे कपड्यांसह दिवाळीच्या काळात लागणारे सर्व साहित्य अतिशय अल्प दरात नागरिकांना उपलब्ध करून दिले.
  मुंबई बंदर विश्र्वस्त मंडळाच्या अधिपत्याखालील जागेवर असलेल्या झोपडपट्टीसाठी मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी. या झोपडपट्टीवासीयांना घरे मिळवून देण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
  एम्पथी फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन. याद्वारे सुमारे ८००० नागरिकांना चष्मा वाटप व २०० नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली.
  क्रिकेट व कॅरमसह कबड्डी या मराठमोळ्या खेळाची विशेष आवड. या तिन्ही खेळांच्या विकासासाठी प्रयत्नरत.
  १९९७ ते २००१ या काळात महाराष्ट्र राज्य कॅरम संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
  महाराष्ट्र शासनाच्या वतीने आत्तापर्यंत दुबई, बँकॉक, हॉंगकॉंग, व्हिएतनाम, चीन येथे अभ्यासदौरे केले. म्हणूनच ‘समृद्ध महाराष्ट्राची’ नेमकी संकल्पना श्री. नांदगांवकर यांच्या मनात तयार आहे.

संपर्क :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड
५, अरहरवाला इमारत, साने गुरुजी मार्ग,
लालबाग, मुंबई - ४०० ०१२
दूरध्वनी : ०२२ - २४७१ ९९ ४०